शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (07:57 IST)

मॅक्सवेलच्या T20 मध्ये 10 हजार धावा पूर्ण

Glenn Maxwell
गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलची बॅट जोरदार गर्जना करत होती. त्याने 43 धावांची दमदार खेळी करत मोठी कामगिरी केली. आता त्याने T20 मध्ये 1000 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो 16वा फलंदाज ठरला. याशिवाय तो डेव्हिड वॉर्नर आणि ॲरॉन फिंचच्या क्लबमध्ये सामील झाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे.
 
पावसामुळे उशीर झालेल्या पहिल्या सामन्यात यजमानांनी सात षटकांत चार गडी गमावून 93 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला सात षटकांत नऊ गडी गमावून केवळ 64 धावा करता आल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता त्यांची नजर दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्यावर असेल.
 
या सामन्यात मॅक्सवेलने शानदार कामगिरी केली . त्याने 19 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या. यादरम्यान त्याने 226.31 च्या स्ट्राइक रेटने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. यासह त्याने मोठी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियासाठी १० हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी डेव्हिड वॉर्नर (12411) आणि ॲरॉन फिंच (11458) यांनी ही कामगिरी केली आहे.
Edited By - Priya Dixit