गुरूवार, 24 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 24 एप्रिल 2025 (09:28 IST)

SRH vs MI: अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा विजय, पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

444dee0d-7ca4-48d9-9e5a-6ca409f98c81
SRH vs MI: सलग चौथ्या विजयासह, मुंबईने १० गुण आणि ०.६७३ च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आठ पैकी सहा सामन्यांत पराभव पत्करून नवव्या स्थानावर आहे.
तसेच ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने हेनरिक क्लासेनच्या ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाच वेळा विजेत्या संघाने १५.४ षटकांत तीन गडी गमावून १४६ धावा केल्या आणि सामना जिंकला. हैदराबादकडून जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा आणि जीशान अन्सारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
मुंबईचा चार धावांनी विजय
सलग चौथ्या विजयासह, मुंबईने १० गुण आणि ०.६७३ च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आठ पैकी सहा सामन्यांत पराभव पत्करून नवव्या स्थानावर आहे. आता मुंबईचा सामना २७ एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी लखनौशी होईल. हार्दिक पंड्याचा संघ या सामन्यात विजय मिळवून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
 
Edited By- Dhanashri Naik