गुरूवार, 24 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 एप्रिल 2025 (11:50 IST)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला

virat
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २.४५ वाजता पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या या हल्ल्यात १७ जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. संतापलेल्यांमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली देखील होता.
 
त्याने एक स्टोरी शेअर केली आणि या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. कोहलीने लिहिले की, 'पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांना मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे.