गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2024 (18:25 IST)

बीड: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अद्याप आरोपी मोकाट,आईची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाचीमागणी

rape
बीड जिल्ह्यांत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली असून या घटनेला उलटून 15 दिवस झाले तरी ही अद्याप आरोपी मोकाट आहे. पीडित मुलीच्या आईने मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. 

बीडच्या माजलगावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉज मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 15 दिवस उलटून देखील अद्याप आरोपी मोकाट आहे त्यांना ताब्यात घेतले नाही. आरोपी सतत पीडित मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत आहे. 
 
 6 जून रोजी माजलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केला आणि तिला शहरातील एका लॉजवर नेऊन तिला धमकावत तिच्यावर पुन्हा बलात्कार केला यावेळी आरोपीचे मित्र देखील तिथे होते. त्यांनी देखील मुलीवर बलात्कार केला आणि कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. 

घडलेल्या प्रकाराने मुलगी घाबरली आणि तिने शाळेत जाण्यास नकार दिला.तिच्या आईने तिला शाळेत न जाण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने मुलीला पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी 30 जून रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपी मोकाट आहे.आणि पीडितेच्या कुटुंबियांना धमकावले आहे. एफआयआर पुन्हा मागे न घेतल्यास मुलीला ठार मारल्याची धमकी दिली आहे. 
पोलिसांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल आन लॉज वर देखील कारवाई केली जाईल.
 
Edited by - Priya Dixit