मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2017 (09:15 IST)

स्मृती मानधनाने धडाकेबाज कामगिरी , भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

ndian women cricketer

महिला क्रिकेट विश्वचषकात सांगलीची पोरगी स्मृती मानधनाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. स्मृतीच्या वादळी नाबाद शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज महिला संघावर तब्बल 7 विकेट्सने विजय मिळवला. स्मृतीने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या.

या सामन्यात भारताने प्रभावी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 50 ओव्हरमध्ये आठ विकेट्स घेत 183 वर गुंडाळला. स्मृती मंधानाच्या नाबाद 106 धावा जोरावर भारतानं 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.स्मृती मानधनाच्या या कामगिरीच्या जोरावर सध्या तिच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मृतीला भारतीय महिला टीमची सचिन संबोधलं जात आहे.