गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (16:57 IST)

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय, पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यास नकार

आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान विरोधात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर जाणार होता. 
 
सामन्यांच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं न्यूझीलंडच्या या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दूसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला एक मोठा धक्का बसला आहे.