संबंधित माहिती
- पीव्ही सिंधूचा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील प्रवास संपला, क्वार्टर फायनलमध्ये पराभव
- PKL 2025: प्रो कबड्डी लीगचा 12 वा हंगाम सुरू होणार, सामना कधी कुठे पाहायचा जाणून घ्या
- लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत
- पीव्ही सिंधू कडून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव
- मीराबाई चानूने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक
निकोलस पूरनने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला
निकोलस पूरनने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. सीपीएल २०२५ च्या १६ व्या सामन्यात ६५ धावांच्या नाबाद खेळीदरम्यान पूरनने ६ षटकार मारून एक मोठा टप्पा गाठला.
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने टी-२० क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. २९ वर्षीय पूरन या दशकात ५०० हून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे. सीपीएल २०२५ च्या १६ व्या सामन्यात पूरनने ही कामगिरी केली. ट्रिनबागो नाईट रायडर्सचा कर्णधार पूरनने बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध ६ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे, त्याने फक्त २७८ डावांमध्ये एका दशकात ५०० षटकार पूर्ण करण्याचा महान पराक्रम केला.
तसेच टी२० क्रिकेटच्या इतिहासात एका दशकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पूरन आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या पुढे फक्त ख्रिस गेल आणि किरॉन पोलार्ड आहे.
Edited By- Dhanashri Naik
