दुसऱ्या T20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर
IND vs ENG T20 Playing 11:भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आता जवळ आला आहे. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने सात गडी राखून जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिका विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.दुसऱ्या सामन्याची प्लेईंग इलेव्हन समोर आली आहे. यामध्ये बदल करण्यात आला आहे.
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड संघाने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. जे चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 25 जानेवारीला होणार आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी बदल करण्यात आल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस ऍटकिन्सन खेळणार नसल्याचे वृत्त आहे. त्याच्या जागी ब्रेडन कार्सला संधी देण्यात आली आहे.
कर्णधार जोस बटलर वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज पहिल्या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. जोस बटलरने 44 चेंडूत 68 धावांची खेळी केली, त्यामुळे संघाला 132 धावा करता आल्या
भारताने अवघ्या 12.5 षटकांत सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दुसऱ्या T20 सामन्यासाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
Edited By - Priya Dixit