सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सिडनी , मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (13:56 IST)

बायकांची शॉपिंग तर खेळाडूंकडे मुलींची जबाबदारी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. भारताकडून कसोटी मालिका खेळणारे खेळाडू सध्या सरावात व्यस्त असून नुकतीच उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन आश्विन यांच्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी आली होती.

खेळाडूंसोबत दौर्‍यावर असलेल्या बायकांनी एक दिवस आपल्या मुलींना सांभाळण्यातून सुट्टी घेत शॉपिंगला जायचा प्लान आखला आणि मुलींची जबाबदारी आपल्या पतींवर सोपवली. अजिंक्य रहाणेने पुजारा आणि आश्विनसोबतचा एक फोटो पोस्ट करत पत्नी राधिकाला माझ्यासाठी काय आणणार हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. वन-डे मालिका पार पडल्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका  खेळवली जाईल. यानंतर 17 डिसेंबरपासून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल.