BCCI कडून या खेळाडूंची पुरस्कारासाठी शिफारस

cricket news
Last Modified बुधवार, 30 जून 2021 (16:21 IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेल रत्नसाठी दोन आणि अर्जुन पुरस्कारासाठी तीन खेळाडूंची नावे केंद्र सरकारकडे पाठविली आहेत. बीसीसीआयने खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी ज्यांची नावे प्रस्तावित केली आहेत, त्यापैकी एक महिला खेळाडूचा समावेश आहे, तर चार पुरुष भारतीय खेळाडूंचादेखील यामध्ये समावेश आहे. अलीकडेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन क्रीडा पुरस्कारांसाठी नावे मागविली होती.

बीसीसीआयने भारतीय महिला संघाचा कर्णधार आणि दिग्गज महिला खेळाडू मिताली राज आणि भारतीय पुरुष कसोटी संघाचे दिग्गज आर अश्विन यांची निवड रत्न म्हणून निवड केली आहे, तर अर्जुन पुरस्कारासाठी नुकताच श्रीलंका दौर्‍यासाठी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिखर धवन, सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे नावे पाठविण्यात आले आहे. तथापि, ही नावे प्रस्तावित आहेत आणि खेळाडू या पुरस्कारांसाठी पात्र आहे की नाही याचा निर्णय क्रीडा पुरस्कार समितीवर आहे.
क्रिडा पुरस्कार क्रिकेटरची यादी
खेल रत्न - मिताली राज आणि आर अश्विन
अर्जुन पुरस्कार - शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह

सध्या क्रीडा संघटना त्यांच्या खेळाडूंची नावे घेण्याची शिफारस करतील आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतिम संमतीनंतर हे क्रीडा पुरस्कार खेळाडूंना देण्यात येतील. तथापि, त्यापूर्वी या पुरस्कारांसाठी दीर्घ प्रक्रिया सुरू आहे. हेच कारण आहे की केवळ जूनच्या शेवटी नावांची शिफारस केली जात आहे.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारांबद्दल बोलताना आतापर्यंत केवळ चार क्रिकेटपटूंना ते मिळाले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावे आहेत. सचिनला वर्ष 1998 मध्ये, 2007 मध्ये धोनीला, 2018 मध्ये विराट आणि शेवटच्या वर्षात 2020 मध्ये रोहितला खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा मिताली राज यांना हा सन्मान मिळाल्यास, ती खेलरत्न मिळविणारी देशातील पहिली महिला क्रिकेटर ठरेल.
वृत्तसंस्था एएनआय च्या माहितीनुसार, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील छेत्री यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे लवकरच सादर केली जातील असे एका अधिकार्‍याने सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे
यंदाच्या आयपीएलच्या समारोप सोहळ्यात रणवीर सिंग परफॉर्म करणार आहे. तो 29 मे रोजी ...

Rajat Patidar: आरसीबीकडून फोन आल्यावर रजतने लग्न पुढे ढकलले ...

Rajat Patidar: आरसीबीकडून फोन आल्यावर रजतने लग्न पुढे ढकलले ,जुलैमध्ये रतलामच्या मुलीशी लग्न करणार
बुधवारी रात्री ईडन गार्डन्स स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला एलिमिनेटरच्या ...

IPL 2022 RR vs RCB, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स अंतिम ...

IPL 2022 RR vs RCB, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स अंतिम फेरीत
IPL 2022 RR vs RCB, क्वालिफायर 2 : राजस्थानने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयी ...

RR vs RCB : कोहलीचा संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश ...

RR vs RCB : कोहलीचा संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी लढणार
आयपीएल 2022 चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ...

RR vs RCB क्वालिफायर 2:राजस्थान-बेंगळुरू अंतिम लढत ...

RR vs RCB क्वालिफायर 2:राजस्थान-बेंगळुरू अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर
आज IPL 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा सामना फाफ डू ...