मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज रिचर्डसनचा खांदा उतरला

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचा खांदा उतरल्यामुळे तो पाकिस्तान दौर्‍यातून परतणार आहे. रिचर्डसनसमोर आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फीट होण्याचे आव्हान आहे. 
 
रविवारी शारजाह मध्ये पाकिस्तान विरुद्ध दुसर्‍या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात रिचर्डसनने 16 धावांत 2 बळी घेतले. फिल्डिंग करताना हातावर पडल्यामुळे त्याला 11व्या ओव्हरमध्ये क्षेत्र सोडून जावे लागले. 
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केले, 'दुर्दैवाने झाय रिचर्डसनचा खांदा उतरला आहे. केट ऑस्ट्रेलियाने असेही सांगितले की सोमवारी हा वेगवान गोलंदाज पर्थ येथे परतेल आणि इजा आकलन करण्यासाठी स्कॅन करवेल.'