गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (22:39 IST)

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठी जबाबदारी

आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जसाठी जोरदार फलंदाजी करणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर मोठी जबाबदारी आली आहे. बुधवारपासून सुरू होत असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सीएसकेचा फलंदाज महाराष्ट्राच्या 20 जणांच्या संघाचे नेतृत्व करेल. राज्य निवड समितीने राहुल त्रिपाठीची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. 
महाराष्ट्राचा संघ ड गटात असून, त्यांचे सामने राजकोटमध्ये होणार आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तराखंड आणि चंदीगडचे संघही या गटात आहेत.  महाराष्ट्राचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध होणार आहे. 
संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), यश नाहर, नौशाद शेख, अझीम काझी, अंकित बावणे, शमशुजामा काझी, मुकेश चौधरी, प्रदीप दाधे, मनोज इंगळे, आशा पालकर, दिव्यांग हिंगणेकर, जगदीश जोपे, स्वप्नील. फुलपगार, अवधूत दांडेकर, तरनजितसिंग ढिल्लोन, सिद्धेश वीर, यश क्षीरसागर, पवन शहा, धनराज परदेशी.