शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (20:19 IST)

रोहित शर्माने विराटला मागे सोडलं, मुख्य निवडकर्ता चेतन शर्माने भारतीय कर्णधाराला देशाचा नंबर वन क्रिकेटर म्हटलं

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना श्रीलंके विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळले आहे, तर रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असून जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. 
 
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी निवड झाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, उजव्या हाताचा फलंदाज हा देशातील पहिल्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. चेतन शर्माच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, रोहित शर्माने सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. कारण याआधी चाहत्यांपासून ते दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत विराट कोहली हा देशाचा नंबर वन क्रिकेटर मानला जात होता.
 
चेतन शर्माने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, “जोपर्यंत रोहित शर्माचा संबंध आहे, तो आपल्या देशाचा नंबर वन क्रिकेटर आहे, तो खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रोहितला कसे सांभाळतो, क्रिकेटपटू त्यांच्या शरीराची काळजी घेतात. आम्ही वेळोवेळी रोहितशी चर्चा करणार आहोत. जर एवढा मोठा क्रिकेटपटू देशाचे नेतृत्व करत असेल, तर निवड समिती या नात्याने आम्हाला पुढील कर्णधार तयार करायचे आहेत आणि त्यांना रोहितच्या देखरेखीखाली ठेवणे खूप मोठे काम असेल.