गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:27 IST)

एस श्रीशांतला केरळ हायकोर्टाकडून दिलासा

मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला सोमवारी केरळ हायकोर्टाने दिलासा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घातलेली आजीवन बंदी हायकोर्टाने हटवली आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतची गेल्या वर्षी दिल्लीतील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले होते. या निकालानंतर श्रीशांतने बीसीसीआयकडे बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता. शेवटी श्रीशांतने केरळमधील हायकोर्टाचे दार ठोठावले होते.