शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (22:03 IST)

श्रीसंथची क्रिकेटमधून निवृत्ती

S Sreesanth Announces Retirement: वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे . रणजी ट्रॉफी-2022 मध्ये श्रीशांत केरळकडून खेळताना दिसला होता. साखळी फेरी संपल्यानंतर या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 2013 मध्ये श्रीशांत मॅच फिक्सिंगमध्ये अडकला होता, त्यानंतर त्याचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. गेल्या वर्षी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला, पण त्याची आयपीएलमध्ये निवड झाली नाही.