शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (11:43 IST)

सचिन तेंडुलकर रुग्णालयामध्ये दाखल, 27 मार्चला झाले होते कोरोना पॉझिटिव्ह

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोनावरील उपचारांसाठी सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याने २७ मार्च रोजी करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपासून सचिन घरीच होम क्वारंटाइन होता.
 
यासंदर्भातील माहिती देत सचिनने ट्विट करत सांगितले की “माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन,” असं सचिनने ट्विट करुन सांगितलं आहे. आज २ एप्रिल असल्याने त्याने २०११ साली विश्वचषक जिंकल्याची त्याने आठवण करुन दिली.