गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:59 IST)

पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरने विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या

Virat-Anushka become parents for the second time
१५ फेब्रुवारीला विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. विराटने आपल्या मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवले आहे. यानंतर आता देशभरातून विराट आणि अनुष्का यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या खास शब्दांत विराट आणि अनुष्काचे अभिनंदन केले आहे.
 
आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय याचे स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आमच्या खासगी जीवनाचा आदर करावा. धन्यवाद, अशा शब्दांत विराट आणि अनुष्काने आपल्या चाहत्यांना संदेश दिला.
 
स्वागत आहे लिटल चॅम्प!
एक्सवर एक पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरने विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या. अकायच्या आगमनाबद्दल विराट आणि अनुष्काचे अभिनंदन. तुमच्या सुंदर कुटुंबात एक अनमोल भर पडली आहे. नावाप्रमाणे तो तुमचे जग अनंत आनंद आणि हास्याने भरेल. कायम जपाव्यात अशा आठवणी तुम्हाला साठवता येतील. जगात आपले स्वागत आहे, लिटल चॅम्प!, असे सचिन तेंडुलकरने पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor