बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 जून 2018 (08:47 IST)

शास्त्री, द्रविड पुढच्या आयपीएलमध्ये सहभाग शक्य

बीसीसीआय आता नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असून त्यानुसार द्रविड आणि शास्त्री यांना ‘आयपीएल’मध्ये सहभागी होता येणार आहे. परस्पर हितसंबंधांमुळे ‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारतीय युवा (१९-कर्षांखालील) क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांना यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सहभागी होता आले नाही. 
 
राहुल द्रविड हा गेल्यावर्षी दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा प्रशिक्षक होता, तर रवी शास्त्री हे समालोचकाच्या भूमिकेत होते. मात्र सध्याच्या घडीला हे दोघेही हिंदुस्थानी संघांच्या प्रशिक्षकपदावर आहेत. त्यामुळे लोढा समितीच्या नियमांनुसार या दोघांना यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कोणत्याही भूमिकेत सहभागी होता आले नव्हते. आता ‘बीसीसीआय’ची प्रशासकीय समिती ‘आयपीएल’च्या नियमांमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. जर या प्रशासकीय समितीने नियमांमध्ये बदल केले, तर शास्त्री आणि द्रविड यांना ‘आयपीएल’च्या पुढच्या मोसमात समालोचन करता येणार आहे.