1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (15:36 IST)

शेफाली वर्माने आशियाई क्रीडा स्पर्धेत खास विक्रम करून इतिहास रचला

गुरुवार, 21 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ आणि मलेशिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे हा सामना सुरुवातीला 15-15 षटकांचा ठेवण्यात आला होता मात्र दुसऱ्या डावात पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने भारतीय महिला संघाच्या वतीने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. 
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक ठोकणारी ही 19 वर्षीय खेळाडू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने 39 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. शफालीने 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत सामन्यात हा टप्पा गाठला.  याआधीही शेफालीने टीम इंडियासाठी अनेक स्फोटक खेळी खेळल्या. 
 
खराब हवामानामुळे सामना उशिरा सुरू झाला. मलेशियाने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 15 षटकांत 2 गडी गमावून 173 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार स्मृती मंधाना ने 16 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांची शानदार खेळी केली
 
जेमिमाह रॉड्रिग्सने 29 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 47 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने 7 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात मलेशियाच्या महिला संघाला केवळ दोन चेंडूच फलंदाजी करता आली, त्यानंतर पुन्हा पावसाने सामना विस्कळीत केला. 
 Edited by - Priya Dixit