बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 ऑक्टोबर 2025 (12:20 IST)

2nd Test- भारत vs वेस्ट इंडिज; शुभमन गिलने वर्ल्डकपमध्ये सर्व भारतीय फलंदाजांना मागे टाकले

shubhman gill
शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी केली, दमदार अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात आतापर्यंत ७५ धावा केल्या आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळली जात आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, नितीश रेड्डी आणि स्वतः कर्णधार शुभमन गिल यांनी भारताकडून जोरदार फलंदाजी केली आहे आणि भारतीय संघाने आतापर्यंत दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत चार गडी गमावून ४२७ धावा केल्या आहे. शुभमन गिल सध्या ७५ धावांसह क्रिजवर आहे आणि तो शानदार फलंदाजी करत आहे.  

सामन्यात अर्धशतक झळकावून शुभमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आणि ऋषभ पंतचा विक्रम मोडला. गिलने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २,७७१ धावा केल्या आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इतर सर्व भारतीय फलंदाजांना मागे टाकले आहे.
Edited By- Dhanashri Naik