ICC Womens ODI Rankings: भारताची अनुभवी सलामीवीर स्मृती मंधांनाने मंगळवारी महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाची फलंदाज म्हणून आपले स्थान मजबूत केले आणि घरच्या मैदानावर झालेल्या विश्वचषकात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवली. 29 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या दोन सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध109 आणि बांगलादेशविरुद्ध नाबाद 34 धावा केल्या आहेत. या खेळींनंतर तिचे 828 रेटिंग गुण झाले आहेत, जे दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशले गार्डनर (731) पेक्षा 97 गुणांनी जास्त आहेत. इंग्लंडविरुद्ध नाबाद शतक केल्यानंतर गार्डनरने सहा स्थानांनी झेप घेतली
मंधांनाला यापूर्वी सप्टेंबर 2025 साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट देखील 90 आणि 31 च्या खेळीनंतर दोन स्थानांनी सुधारणा करत टॉप थ्रीमध्ये आली आहे. इंग्लंडची एमी जोन्स चार स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर (656) पोहोचली आहे,
तर अॅनाबेल सदरलँडने टॉप 40 मध्ये सर्वात मोठी झेप घेतली आहे, 16स्थानांनी सुधारणा करून 16 व्या स्थानावर (613) पोहोचली आहे. दुखापतीमुळे विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडणारी भारतीय सलामीवीर प्रतीका रावलने 564 च्या रेटिंगसह टॉप 30 मध्ये (27 व्या स्थानावर) प्रवेश केला आहे.
Edited By - Priya Dixit