शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (12:29 IST)

IPL मध्ये दोन नव्या संघांच्या घोषणेनंतर सौरव गांगुलीचा राजीनामा

Sourav Ganguly resigns after the announcement of two new teams in the IPL
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी एटीके मोहन बागानच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आयएसएल संघ बागानच्या मालकीच्या RPSG ग्रुपने आयपीएलची लखनौ संघ विकत घेतल्यानंतर दोन दिवसांनी, क्रिकबझने हितसंबंधाचा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी संचालकपदाचा राजीनामा दिल्याची पुष्टी केली आहे.
 
RPSG समुहाने लखनौ संघ खरेदी केल्यानंतर, BCCI अध्यक्ष आणि कंपनीचे संचालक या नात्याने हितसंबंधांचा संघर्ष होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या, त्यानंतर गांगुली यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. गांगुली यांना असे वाटते की जर ते या गटाचे अध्यक्ष म्हणून राहिले तर त्यांना निष्पक्ष काम करणे कठीण होऊ शकते.
 
संजीव गोएंका यांच्या मालकीच्या RPSG समुहाने लखनौ फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांची बोली लावून जिंकली, तर CVC कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी मिळवण्यासाठी 5625 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. गोयंका हे दोन वर्षांपासून पुणे फ्रँचायझी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे (आरपीएस) मालक आहेत.