1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Squad announced for the T20 series against England and Ireland

Team India Squad: इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर कर्णधार; तिलक वर्मा उपकर्णधारपदी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ पुरुष निवड समितीची दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर करण्यासाठी मुंबईत बैठक झाली. विशेष म्हणजे, श्रेयस अय्यर टी-२० संघाचा नवा कर्णधार बनला आहे, तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आपल्या कर्णधारपदी भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघातून मुक्त करण्यात आले आहे.
सूर्यकुमारने केवळ कर्णधारपदच गमावले नाही, तर तो संघातले आपले स्थानही टिकवू शकला नाही.
सूर्यकुमार यादवने २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध ८४ धावांची शानदार नाबाद खेळी केली, पण स्पर्धेतील हे त्याचे एकमेव अर्धशतक होते.त्याने संपूर्ण स्पर्धेत ९ सामन्यांमध्ये २४२ धावा केल्या आणि त्याची सरासरी ३०.२५ होती.
श्रेयस अय्यरकडे संघाची कमान सोपवण्यात आली असून, तिलक वर्मा संघाचा नवीन उपकर्णधार बनला आहे. तिलक गेल्या काही काळापासून टी-२० संघाचा नियमित भाग आहे आणि आता तो श्रेयससोबत नेतृत्वाची भूमिकाही बजावताना दिसेल. दरम्यान, ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांचीही यष्टीरक्षक म्हणून संघात निवड झाली आहे. अक्षर पटेलने संघात आपले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांच्यावर असेल.१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच वरिष्ठ संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएल २०२६ मध्ये वैभवने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. 
 
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या रूपाने तीन विशेषज्ञ फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. दरम्यान, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील. 
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, रवी बिष्णो, प्रिन्स हरदीप सिंह, अर्शदीप सिंह, 
 
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, टिळक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव,
Edited By - Priya Dixit  
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
जळगावमध्ये स्कॉर्पिओ कारची दुचाकीला धडक बसून अपघातात चार जणांचा मृत्यू