सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (13:50 IST)

T 20 world cup :या तारखेला टी -20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एक महान सामना होईल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी -20 विश्वचषकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत, तसेच कोणता संघ कोणत्या गटात असेल, याचीही घोषणा करण्यात आली आहे. टी -20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही,परंतु लीग राउंड चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल,असे आयसीसीने टी -20 विश्वचषकासाठी गट घोषित केले  तेव्हाच निर्णय घेण्यातआला. भारत आणि पाकिस्तान गट -2 मध्ये एकत्र आहेत आणि सुपर -12 मध्ये स्पर्धा करतील. भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असलेल्या महान सामन्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. एएनआयच्या मते, टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
 
एएनआयला याची पुष्टी करताना, एका जवळच्या सूत्राने सांगितले,की  हा सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल." गेल्या महिन्यात आयसीसीने पुरुषांच्या टी 20 विश्वचषक 2021 साठी गट जाहीर केला.टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानला सुपर -12 च्या गट -2 मध्ये स्थान देण्यात आले आहे.