सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

टीम इंडिया विजयी, मालिका 3-0 अशी जिंकली

टीम इंडियाने गॉल आणि कोलंबो कसोटी सामन्यांपाठोपाठ श्रीलंका दौऱ्यातली कॅण्डी कसोटीही जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून, कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला.

भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांच्या दमदार शतकामुळे भारताने जबरदस्त खेळी करत पहिल्या डावात 487 धावांची मजल मारली होती. त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. त्यामुळे भारताकडे तब्बल 352 धावांची आघाडी होती.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक बाद 19 धावांवरुन सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 181 धावांवर आटोपला. भारताकडून आर अश्विनने 4 मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.