1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (16:41 IST)

‘अॅम्बी व्हॅली’ लिलावाचा मार्ग मोकळा

suprime court
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा उद्योगसमूहाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘अॅम्बी व्हॅली’ची राखीव किंमत 37 हजार 392 कोटी रुपये ठेऊन या लिलावाला सुरुवात करण्यात येणार आहे.
 

सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला 20 हजार कोटी रूपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ते जमा न केल्यानं सहारा समूहाला आता मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज मिळून 37 हजार कोटी रूपये रक्कम सहारा समूहाला जमा करावे लागतील, असं सेबीने म्हटलं होतं. त्यासाठी ‘अॅम्बी व्हॅली’च्या लिलावप्रक्रियेला सेबीने सुरुवात केली असू,न हीच रक्कम सहारा समूहाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे, असंही सेबीकडून सांगण्यात आलं आहे.