शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:34 IST)

IND vs WI: टीम इंडिया वेस्ट इंडिजसोबत एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी अहमदाबादला पोहोचली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचे खेळाडू अहमदाबादला पोहोचले आहेत. 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत 0-3 असा क्लीन स्वीप केल्यानंतर मेन इन ब्लू या मालिकेत पुनरागमन करण्याचा विचार करेल. घरच्या मालिकेत, भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध 6 फेब्रुवारी, दुसरा 9 आणि तिसरा 11 फेब्रुवारी रोजी खेळायचा आहे. यानंतर 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. कोलकातामध्ये टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.   
 
मालिकेत खेळणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंनी रविवार आणि सोमवारी बायो बबलमध्ये प्रवेश केला. लेगस्पिनर युझवेंद्र चहलने शनिवारी अहमदाबादला निघतानाचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. फ्लाइटमध्ये त्याच्यासोबत सलामीवीर शिखर धवनही बसला होता. भारताचा पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका असेल. 
 
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडिया टुडेला सांगितले की, खेळाडू तीन दिवस क्वारंटाईनमध्ये असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदिवसीय मालिकेसाठी 18 खेळाडूंचा संघ निवडला आहे आणि आता संघ व्यवस्थापनासमोर पहिले आव्हान आहे ते एक मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे. 
 
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर , युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.