वानखेडेवर टीम इंडियाचा गौरव, BCCI ने दिले 125 कोटी रुपये
T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले,
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली आणि शेवटी वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला.भारतीय संघातील खेळाडूंचा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौरव केला आहे. जय शहा यांनी त्यांना 125 कोटींचा धनादेश दिला.
रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा म्हणाला की ही ट्रॉफी संपूर्ण देशासाठी आहे आणि प्रत्येक विश्वचषक ट्रॉफी भारतासाठी खास आहे. रोहित शर्माने हार्दिक पांड्याबद्दल सांगितले की, ही ट्रॉफी जिंकण्यात त्याची भूमिका सर्वात महत्त्वाची होती.
Edited by - Priya Dixit