मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 जानेवारी 2025 (17:44 IST)

वरुण चक्रवर्तीने 5 विकेट घेऊन इतिहास रचला

Varun Chakravarthy
भारत आणि इंग्लंडचे संघ राजकोटच्या मैदानावर तिसऱ्या T20 सामन्यासाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही त्याने नाणेफेक जिंकली होती. यानंतर भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. वरुण चक्रवर्तीने तिसऱ्या टी-20 सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्यासमोर इंग्लंडचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि बाद झाले.या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकात केवळ 24 धावा देत 5 बळी घेतले. 
 टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच विकेट घेण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. भारतासाठी T20I क्रिकेटमध्ये दोन पाच बळी घेणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी, कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी T20I क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. 
 
वरुण चक्रवर्तीने 2021 साली भारतीय संघात पदार्पण केले. याशिवाय तो 2021 च्या टी20 विश्वचषकातही संघाकडून खेळला होता. पण तिथे त्याने खराब कामगिरी केली.
यानंतर, त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी दमदार कामगिरी केली आणि 2024 साली टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. तेव्हापासून त्याची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 16 T20I सामन्यांमध्ये एकूण 29 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या 71 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 83 विकेट आहेत. 
Edited By - Priya Dixit