रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 14 मे 2017 (09:40 IST)

विराटच्या ताफ्यात 'ऑडी क्यू 7' समावेश

भारताचा कर्णधार  विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. या कारचे नाव आहे ऑडी क्यू 7. विराटने फेसबुकवर ऑडी क्यू 7 सोबतचा फोटो शअर केला आहे. या फोटोत त्याने आपली कार अपग्रेड करण्याबाबत ऑडी कंपनीचे आभार मानलेत. ऑडी इंडियाचे प्रमुख राहील अन्सारी यांनी विराटला या गाडीची चावी सोपवली. या कारची किंमत तब्बल 72 लाख रुपये आहे. विराटच्या पर्सनल कार कलेक्शनमध्ये ऑडीच्या अनेक कार आहेत. त्याच्याकडे 7 लग्झरी कार आहेत यात पाच ऑडी आहेत. विराटला विविध कार जमवण्याचा जो छंद लागलेला आह. त्यावरून त्याचे कार प्रेम दिसून येते. म्हणतात ना आवडीला मोल नसते.