बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलंबो , शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:44 IST)

भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची संधी

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी  सामन्यात भारताने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सीरिजची तिसरी टेस्ट १२ ऑगस्टपासून कॅन्डीमध्ये खेळवली जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं लागोपाठ ८ सामने जिंकले आहेत. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पुन्हा विजय झाला तर श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे.
 
नियमीत कर्णधार झाल्यावर कोहलीने २०१५ मध्ये श्रीलंकेत पहिली सीरिज खेळली होती. या सीरिजपासूनच भारताचा लागोपाठ ८ सीरिज जिंकण्याचा सिलसिला सुरू झाला होता. ८५ वर्षांमध्ये फक्त एकदाच भारताने परदेश दौऱ्यामध्ये तीन टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला श्रीलंकेला ३-० ने हरवण्याची नामी संधी चालून आली आहे.
 
मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाळी भारताने १९६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची सीरिज ३-१ ने जिंकली होती. या सीरिजमध्ये भारत ड्यूनेडिनमधली पहिली टेस्ट जिंकला होता तर क्राईस्टचर्चमधली दुसरी टेस्ट हारला होता. यानंतर वेलिंग्टन आणि ऑकलंडमधली मॅच जिंकत भारताने इतिहास घडवला होता.