विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ऑफ द इयर
मेलबर्न- भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी आणि कप्तानीची भूरळ आता परदेशी क्रिकेटप्रेमीनाही पडू लागली आहे. आता तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे. त्याआधी आयसीसीने निवडलेल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वसुद्धा विराटकडे सोपवण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला यावर्षीचा वनडे संघ जाहिर केला. आश्चर्याची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथऐवजी विराट कोहलीकडे सोपवले आहे.
विराटबरोबरच जसप्रीत बुमराहलाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकाँक, इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा बाबर आझम यांचीही या संघात निवड करण्यात आली आहे.