मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (17:52 IST)

विराटने मोदींना दिल्या शुभेच्छा

भाजपच्या धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पीएम मोदींच्या या विजयानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवर अकाऊंटवरुन पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत म्हटलं की, 'नरेंद्र मोदीजी यांना शुभेच्छा. आम्हाला विश्वास आहे की, तुमच्या व्हीजनमुळे भारत अधिक उंचीवर जाईल. जय हिंद.' असे लिहिले आहे.