शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (11:33 IST)

Virat Meets Quick Style Gangप्रसिद्ध डान्स ग्रुपसोबत कोहलीचा ठेका

virat kohali
Instagram
Virat Meets Quick Style Gang: टीम इंडियाचा सलामीवीर विराट कोहली त्याच्या खेळाव्यतिरिक्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो रोज वेगवेगळे उपक्रम करताना दिसतो. त्याचवेळी तो क्विक स्टाइल (Quick Style)या प्रसिद्ध डान्स ग्रुपसोबत जुगलबंदी (Virat Kohli Dance) करताना दिसला. त्याचा व्हिडिओ क्विक स्टाइल ग्रुपने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 
 
क्विक स्टाइल गँग हा एक डान्स ग्रुप आहे. जो नॉर्वेजियन हिप-हॉप डान्स ग्रुप आहे. तर हा गट सध्या भारतात आला आहे. अनेक कॉन्सर्ट केल्यानंतर हा ग्रुप जाऊन विराट कोहलीला भेटला.
 

यादरम्यान तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की ग्रुपमधील एका सदस्याकडे बॅट आहे. त्यानंतर कोहली येतो आणि त्याच्याकडून बॅट मागतो. मग ग्रुपचे सर्व सदस्य सोबत येतात आणि विराट कोहलीसोबत मस्त डान्स करायला लागतात. तसेच हा व्हिडिओ पोस्ट करताना क्विक स्टाइल ग्रुपने कॅप्शनमध्ये लिहिले की, "जेव्हा विराट क्विक स्टाइलला भेटला."
Edited by : Smita Joshi