शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (15:42 IST)

ये है मोहब्बतें फेम अभिनेत्रीचं लग्न

Krishna Mukherjee 'ये है मोहब्बतें'ची अभिनेत्री कृष्णा मुखर्जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने लग्नाच्या आधी जोरदार पार्टी केली ज्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
 
कृष्णा तिच्या बॉयफ्रेंडसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्रीचा प्रियकर नौदलात आहे. त्याने आपली एंगेजमेंटही व्हाइट वेडिंग स्टाइलमध्ये केली. दरम्यान अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. 
 
तर 'ये है मोहब्बतें'मध्ये 'सिम्मी'ची भूमिका करणारी अभिनेत्री शिरीन मिर्झाने देखील कृष्णाच्या बॅचलर पार्टीशी संबंधित काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये शिरीन इलेक्ट्रिक ब्लू कलरमध्ये वन शोल्डर फ्रिंज ड्रेस घालून खूप मजा करताना दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीची स्टाईल पाहून चाहत्यांना आपल्या इमोशन्सवर नियंत्रण ठेवता येत नाही. शिरीनच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड अवतार आवडला आहे.