शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (12:11 IST)

सेहवागने दिला विराटला नाव बदलण्याचा सल्ला!

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने निवृत्ती स्वीकारली असली तरी सोशल मीडियावर त्याची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सेहवाग जसा मैदानात आक्रमक फलंदाजी करायचा तसाच तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील गेल्या काही महिन्यांपासून स्ट्रेट ड्राईव्ह फटके लगावताना दिसतो आहे. आपल्या हटके अंदाजात क्रिकेटपटूंना शुभेच्छा देणारे सेहवागचे ट्विट्स याआधी चर्चेत होते. 
 
आता सेहवागने भारताच्या सध्या दमदार फॉर्मात असणार्‍या कसोटी कर्णधार विराट कोहलीचे ट्विटरवर कौतुक केले आहे. कोहलीचे कौतुक करताना विरुने एक आगळावेगळा सल्ला त्याला दिला आहे. कोहलीने आता वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आपले नाव बदलण्याचा निर्णय घ्यायला हवा, असा सल्ला देत विरुने कोहलीला त्याचे नाव बादल (ढग) असे बदलण्यास सुचवले आहे. विराट कोहली प्रतिस्पर्धी संगासाठी नेहमी एका वादळाप्रमाणेच ठरतो. 
 
कोहलीच्या वादळी खेळीने प्रतिस्पर्धी संघ भुईसपाट होऊन जातो आणि दुसर्‍या दिवशी सर्व वर्तमानपत्रात कोहली वादळाच्याच चर्चा असतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना आता कोहलीच्या वादळाची सवयच झाली आहे. म्हणूनच कोहलीने आपले नाव बदलून आता बादल असे करायला हरकत नाही, असे मिश्कल ट्विट विरूने आपल्या ट्विटर हॅण्डलवर केले आहे.