रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (12:15 IST)

सेहवाग,टेलरमध्ये रंगलं ट्विटर युद्ध

हटके ट्विटमुळे सोशल मीडिया गाजवणारा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने, न्यूझीलंडच्या विजयानंतरही तसंच हटके ट्विट केलं.न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा फलंदाज रॉस टेलरला उद्देशून हे ट्विट होतं. सेहवागने रॉस टेलरचा भारतीय भाषेत ‘दर्जी’ असा उल्लेख केला.
 
सेहवागच्या ट्विटला रॉस टेलरनेही तसंच उत्तर दिलं, तेही हिंदीत.आधी सेहवाग म्हणाला, “वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”.सेहवागच्या या ट्विटला रॉस टेलरने हिंदीत उत्तर दिलं.“भाई, अगली बार अपना ऑर्डर टाईम पे भेज देना, सो मै आपको अगली दिवाली के पहले डिलिव्हर करुंगा, हॅप्पी दिवाली”, असं टेलर म्हणाला.
 
या ट्विटनंतर गप्प बसेल तो सेहवाग कुठला. सेहवाने टेलरच्या या ट्विटलाही उत्तर दिलं. यावेळी सेहवागने फाईव्ह स्टारच्या जाहिरातीतील डायलॉग मारुन टेलरला उत्तर दिलं.सेहवाग म्हणाला, “हाहाहा, मास्तरजी, इस साल वाली पतलून एक बिलांग छोटी करके देना नेक्स्ट दिवाली पे. रॉस द बॉस, मोस्ट स्पोर्टिंग”.यावर टेलरने उपरोधी टोला लगावत,“तुमच्या टेलरने या दिवाळीत चांगले कपडे शिवले नाहीत का?” असं ट्विट केलं यानंतरही सेहवाग शांत बसला नाही. सेहवाग म्हणाला, “दर्जी जी, तुमच्या इतक्या उच्च दर्जाच्या शिवणकामाची स्पर्धा कोणीच करु शकत नाही. मग ते पँट असो वा पार्टनरशीप”