वेस्ट इंडिजने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पाच विकेट्सने जिंकला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
आता या मालिकेतील निर्णायक सामना 12 ऑगस्ट रोजी त्रिनिदादमध्ये खेळला जाईल. रविवारी त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 37 षटकांत सात विकेट्सवर 171 धावा केल्या. वेस्ट इंडिजला डीएलएस नियमानुसार 35 षटकांत 181 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 33.2 षटकांत पाच विकेट्स गमावून 184 धावा केल्या आणि सामना पाच विकेट्सने जिंकला.
37 षटके संपताच पाऊस सुरू झाला आणि पंचांना डकवर्थ लुईस नियमानुसार लक्ष्य द्यावे लागले. 37 षटकांपर्यंत पाकिस्तानने सात विकेटवर 171 धावा केल्या होत्या. त्यानंतर हसन नवाज 30 चेंडूत 36 धावांवर आणि शाहीन आफ्रिदी सात चेंडूत 11 धावांवर नाबाद होता. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या.
Edited By - Priya Dixit