शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (07:25 IST)

World Cup 2023: विश्वचषक सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, भारतचा इंग्लंड आणि नेदरलँड विरुद्ध सामना

ODI World Cup Warm-up Matches 2023 Schedule :  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. आयसीसीने बुधवारी (23 ऑगस्ट) सांगितले की, विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांपूर्वी 10 सराव सामने खेळवले जातील. भारतीय संघ इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये त्याचा सामना इंग्लंडशी आणि 3 सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये नेदरलँडशी होणार आहे.
 
पाच ऑक्टोबर रोजी विश्वचषकाच्यापूर्वी 10 संघ 50 ओव्हर्सचे दोन दोन सराव  सामने खेळणार आहे. भारतातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमसह हैदराबादलाही सराव सामन्यांचे यजमानपद मिळाले. साखळी फेरीचे तीन सामनेही हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. या मैदानावर पाकिस्तानचा सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी आणि 10 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान, 9 ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील.
 
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सराव सामना खेळला जाईल पहिल्या सराव सामन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सर्व सामने दुपारी २ वाजल्यापासून खेळवले जातील. या दरम्यान, सर्व संघांना 15 खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी असेल.
 
विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत पोहोचले आहेत. मुंबई आणि कोलकाता येथे सामने आहेत.
 
गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. 
 




Edited by - Priya Dixit