शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 20 ऑगस्ट 2023 (17:18 IST)

फिफा विश्वचषक : विजेतेपदासाठी स्पेन आणि इंग्लंडच्या रणरागिनी मैदानात

महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात युरोपियन चॅम्पियन इंग्लंडसमोर स्पेनचं आव्हान आहे आणि एका वर्षाच्या आता त्यांना इतिहास रचण्याची दुसरी संधी मिळाली आहे.
‘द लॉयनेस’ असं संबोधल्या जाणाऱ्या ब्रिटिश महिला फुटबॉल टीमने हा अंतिम फेरीचा सामना जिंकला तर असं करणारी ती इंग्लंडची पहिली टीम असेल. याशिवाय जागतिक पातळीवर 1966 नंतर अंतिम फेरी जिंकणारीही ती देशातली पहिली टीम असेल.
 
1966 मध्ये इंग्लंडच्या पुरुष टीमने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता.
 
मात्र सध्या त्यांच्यासमोर स्पेनचं मोठं आव्हान आहे. ते पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळत आहेत.
 
ऑस्ट्रेलियात हा सामना होत आहे. या सामन्यावेळी मैदानात 75 हजार प्रेक्षक उपस्थित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
 
हा सामना बीबीसी वन टीव्ही चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. कोट्यवधी लोक हा सामना पाहण्याची शक्यता आहे.
 
महिला विश्वकपचं हे नववं पर्व आहे. आतापर्यंत चार वेगवेगळ्या टीम वर्ल्ड कप जिंकली आहे. जी टीम हा सामना जिंकेल, ती पाचवा वर्ल्ड कप जिंकेल.
 
आतापर्यंत अमेरिकेने चार वेळा, जर्मनीने दोन वेळा, नॉर्वे आणि जपानने एक एकदा महिला वर्ल्ड कप जिंकला आहे.
 
इंग्लंडचा दावा
इंग्लंडच्या टीमची मॅनेजर सरीना विगमॅन म्हणतात, “सर्व लोक 1966 बद्दल बोलत आहेत. म्हणून आम्ही सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करू.”
 
त्या पुढे म्हणाल्या, “अंतिम फेरीत पोहोचणं आमच्यासाठी फारच खास आहे मात्र आता आम्हाला हा सामना जिंकायचा आहे.”
 
तेरा महिन्यांपूर्वी ब्रिटिश महिला फुटबॉल टीमने जर्मनीचा पराभव करून युरोपियन चॅम्पियनशिपवर पहिल्यांदा नाव कोरलं होतं.
 
युरो 2022 च्या अंतिम फेरीपर्यंत इंग्लंडचा प्रवास शांततापूर्ण होता मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता.
 
युरो कप जिंकणाऱ्या टीममध्ये समावेश असलेल्या लिया विलियमसन, बेथ मीड, फ्रॅन किर्बी वर्ल्ड कप च्या अंतिम फेरीत पोहोचण्याआधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे जायबंदी झाल्या.
 
त्याचवेळी नायजेरियाविरुद्ध खेळताना एक खेळाडू किरा वॉल्श यांना दुखापत झाली तर एका खेळाडूला निलंबित करण्यात आलं होतं.
 
तरीही विगमॅन यांची टीम इतका दबाव असताना शांतपणे खेळत राहिली. उपांत्यपूर्व सामन्यात कोलंबियाच्या विरोधात सातव्या मिनिटातच च्या मागे झाल्य होत्या.
 
वॉल्श यांची दुखापत फारशी गंभीर नव्हती त्यामुळे त्या एकाच मॅचपुरता सामन्याच्या बाहेर होत्या. दोन मॅच बाहेर राहिल्यावर जेम्मस अंतिम फेरीसाठी सज्ज आहेत.
 
स्पेनच्या टीममध्ये किती ताकद?
 
आता विगमॅन यांना निर्णय घ्यायचा आहे की सेमीफायनल मध्ये ज्या पद्धतीने टीमला मैदानात उतरवलं होतं तसंच यावेळी उतरवायचं आहे की त्यात फेरबदल करून जेम्सला परत आणायचं आहे. सेमी फायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3-1 ने पराभव केला होता.
 
लिया विलियमसन जायबंदी झाल्यावर मिली ब्राईट कर्णधार झाली होती. ब्राइट म्हणते, “विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणं हे एखाद्या स्वप्नपूर्तीसारखं आहे. मुलींचं नेतृत्व करणं एकदम विशेष आहे.”
 
“आम्ही आमचा गेमप्लॅन तयार केला आहे. मैदानात तयार केल्यावर त्याचं योग्य पद्धतीने पालन करायचं आहे. आम्ही वर्ल्डकप घेऊन यावा अशीच आमच्या देशाची इच्छा आहे.”
 
स्पेनने जपानला ग्रुप स्टेजमध्ये 4-0 ने पराभव केला होता. त्यानंतर टीमचा प्रवास एकदम जोमाचा झाला आहे. स्पेन सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडपेक्षा दोन क्रमांक खाली आहे.
 
स्पेनची सेंटर बॅक खेळाडू इरिन पेरेडेज सांगते, “स्पेन आधीपासूनच फुटबॉलप्रेमी देश आहे. मात्र ही आमची जागा नव्हती. लोक तरी निदान अशीच जाणीव करून देत आहेत.”
 
“आमच्याकडे वर्ल्ड कप खेळण्याची संधी आहे. आता त्याचा आनंद घेण्याची वेळ आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
Football, 100 Women,women,FIFA World Cup, Spain vs England , फिफा विश्वचषक, स्पेन vs  इंग्लंड, Sportsफुटबॉल, 100 विमेन, महिला, क्रिडा