सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (21:10 IST)

युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन भर मैदानात भिडले

लीजेंड्स लीगचा पहिला क्वालिफायर इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात जोधपूरमध्ये खेळला गेला.गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना 4 गडी राखून जिंकून अंतिम फेरीत धडक मारली, मात्र सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली.या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण इंडिया कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनशी भिडताना दिसत आहे.काही वेळाने या शाब्दिक युद्धाचेही हाणामारीत रूपांतर झाले.