मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

युवराज भारतासाठी गॉड गिफ्ट: संदीप पाटिल

राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पायिल यांनी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज युवराजसिंगचे कौतुक करताना म्हटले की तो भारतीय संघाला मिळालेला गॉड ‍गिफ्ट आहे. मात्र, 2019 वर्ल्ड कप खेळायचा असेल तर युवराजसिंगसाठी फिटनेस तितकाच महत्त्वाचा आहे हे सांगायलाही ते विसले नाहीत.
 
युवराजसिंग भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास संदीप पाटिल यांनी व्यक्त केला आहे. युवराज भविष्याबाबत त्यांना विचारण्यात आले तेव्हा संदिप यांनी सर्व काही फिटनेस आणि फॉर्मवर अवलंबून असल्याचे सांगितले. युवराज म्हणजे गॉड गिफ्ट आहे. मी त्याचा खूप मोठा चाहता असून यापुढे ही राहणार आहे.