गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (15:17 IST)

युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, आईच्या डोळ्यात आले अश्रू

प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि रेकॉर्ड सम्राट युवराज सिंहने सोमवारी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जवळपास 17 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या युवराजने म्हटले की मी कधीही खचलो नाही. खेळाप्रती माझं प्रेम आणि द्वेषाचा संबंध आहे. युवराज निवृत्तीची घोषणा करीत असताना, समोर बसलेल्या त्याच्या आई शबनम यांच्या डोळ्यात अश्रू आले.
 
युवराजने भारतासाठी 40 टेस्ट, 304 एकदिवसीय आणि 58 ट्वेंटी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने क्रमशः 1900, 8701 आणि 1177 धावा घेतल्या. युवराजने 2017 मध्ये इंग्लंडविरूद्ध शेवटचा ट्वेंटी -20 सामना आणि जून 2017 मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
 
महान फलंदाज युवराजने गोलंदाजीत देखील प्रयत्न केला. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 9, एकदिवसीय सामन्यांमध्ये 111, टी -20 मध्ये 28 आणि आयपीएलमध्ये 36 बळी घेतल्या. कर्करोगाविरुद्ध लढा देणार्‍या युवराजने सांगितले की आता तो कर्करोग पीडितांची मदत करेल. 
 
12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगड शहरात जन्मलेल्या युवराज सिंहचे वडील योगराज देखील भारतीय संघासाठी खेळून चुकले आहे. बालपणात स्केटिंगसाठी उत्कट इच्छा असणार्‍या युवराजला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा त्याच्या वडिलांकडून मिळाली होती. युवराजला या खेळात करिअर करण्यास त्याच्या वडिलांनी खूप प्रोत्साहन दिले. युवराजसाठी त्यांनी घरातच पीच तयार केलं होतं. युवराजने आपल्या बालपणात एका पंजाबी चित्रपट 'मेहंदी शग्ना दी' मध्येही काम केले होते.