आज हॉलंडविरुद्ध विडीज!
ND
हॉलंड संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या 'ब' गटातील वेस्ट इंडीजशी लढत करण्यासाठी तयार आहे. याच मैदानावर विडीजला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. विडीज हॉलंडचा नक्कीच पराभव करेल असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. आता मात्र परीस्थिती बदलली आहे. विडीजची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि हॉलंडसारखा कमकुवत संघही त्यांना आव्हान देऊ लागला आहे. विश्वचषकात आपल्या संघाने छाप पाडावी असे हॉलंडचा कर्णधार पीटर बोरेनला वाटते. आगामी विश्वचषक स्पर्धेत संघाची संख्या १४ वरून १० घटविण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा आहे हे त्याला सिद्ध करायचे आहे.

