इंग्लंडसाठी आज करो या मरो!
ND |
ही लढत हरल्यास वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीतून बाद होणार्या कसोटी खेळणार्या देशांपैकी इंग्लंड एकमेव संघ असेल. त्यामुळे या लढतीत अॅन्ड्रयू स्ट्रॉसच्या संघाला सर्वस्वपणाला लावून खेळावे लागणार आहे. दुसरीकडे या वर्ल्डकपमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करणार्या विंडीजचे स्वप्न इंग्लंडला पराभूत करून भारताविरुद्ध लढतीपूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे असणार आहे.

