1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

इम्रान ताहीरच्या जखमी!

ND
यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दुखापतीचे कार्यक्रम सुरूच असून आता द. आफ्रिकेचा संघही दुखापतींमुळे त्रस्त झाला आहे. पाक वंशाचा फिरकीपटू इम्रान ताहीरच्या अंगठ्‍याला दुखापत झाली असून, तो भारताविरूद्ध शनिवारी होणार्‍या लढतीत खेळण्याची शक्यता कमीच आहे.

इंग्लंडविरूद्ध सामन्यात जॉनाथन ट्रॉटचा स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेताना ताहीरला ही दुखापत झाली होती. भारताविरुद्ध त्याला खेळवायचे अथवा नाही याचा निर्णय अद्याप गेण्यात आला नसल्याचे द. आफ्रिकेचे संघ व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा