1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

कोची संघाची आयपीएल मधून माघार

वादात अडकलेल्या कोची संघाने अखेर आयपीएल मधून माघार घेण्‍याची घोषणा केली आहे. संघाच्या मालकांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.

आयपीएलच्या व्यवस्थापनाला या संदर्भात माहिती देण्यात आली असून, 28 तारखेला होणार्‍या बैठकीत आयपीएलचे अधिकारी यावर निर्णय घेणार आहेत.

बीसीसीआयने कोची संघाला 30 दिवसांच्या आत परस्परातील मतभेद सोडवण्यास सांगितले होते. यानंतर संघाने माघार घेत असल्याचे पत्रच आयपीएलकडे सोपवले आहे.