1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

चेन्नई सेमीफायनलमध्ये

आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने काल पंजाबचा 24 धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये खेळण्याचे पंजाबचे स्वप्न धुळीस मिळवले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात पंजाबला दोन विकेट असूनही धावसंख्या गाठता आली नाही.

नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे दोन षटक वगळता चेन्नईचे फलंदाज इतर षटकांमध्ये फटकेबाजी करू शकले नाही.

पार्थिव पटेलने केलेल्या धावांच्या जोरावर चेन्नईने 20 षटकांमध्ये 117 धावांचे लक्ष पंजाबला दिले होते. परंतु याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ केवळ 92 धावाच काढू शकला. पंजाबकडे दोन खेळाडू शिल्लक असतानाही संघाला विजयी टप्पा गाठता आला नाही.

चार षटकात केवळ 8 धावा देणाऱ्या मुरलीधरनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.