जाहिरातींवर 24 लाख मिळतील!
विश्वकरंडक स्पर्धेत टीम इंडियाने साखळी फेरी पार करून बाद फेरीत धडक मारल्यास टी.व्ही. वरील जाहिरातींचा दर 10 सेकंदाला 24 लाख रुपयांवर जाईल, असा अंदाज वर्ल्डकपचे प्रसारण करणार्या ईएसपीएन-स्टार स्पोर्टस् या वाहिनीने व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताने फायनलपर्यंत धडक मारावी अशी प्रार्थना या वाहिनीतर्फे केली जात आहे.
टीम इंडियाने चांगली कामगिरी करून बाद फेरीमध्ये प्रवेश केला तर सध्या असलेल्या दरांपेक्षा जाहिरातीचे दर 5 ते 6 टक्क्यांनी वाढतील, असे ईएसनीएन सॉफ्टवेअर कंपनीचे उपाध्यक्ष संजय कैलाश यांनी सांगितले. टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानंतर अनेक नवे जाहिरात दर आपल्या जाहिराती घेवून येतील आणि त्यामुळे रेटही प्रचंड वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे भारताच्या सर्व लढती प्रसारित करणार्या दूरदर्शनचाही 'टाइम स्लॉट' विकला गेला आहे. ईएसपीएनच्या तुलनेत दूरदर्शनच्या जाहिरातींचे दर अतिशय कमी आहेत.