टीम इंडियाचा रोमांचक विजय!
ND |
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 221धावांचे आव्हान ठेवले असताना रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळविला. भारताची सुरवात डळमळीत झाली. सलामीवीर मुरली विजय 1 धावेवर बाद झाला. रोहित शर्मा (23) आणि विराट कोहली (28) यांनी संयमी खेळी करीत संघाचा डाव सावरला.
मात्र, या दोघांचाही अडसर मॉर्कलनेच दूर केला. स्टेन आणि मॉर्कल या आफ्रिकेच्या जोडीने भेदक गोलंदाजीने भारतीय फलंदाजीवर प्रचंड दडपण आणले. सुरेश रैनाची (37) संयमी फलंदाजी मॉर्कलने संपुष्टात आणण्यापूर्वी पठाणबरोबर सहाव्या विकेटसाठी सुरेश रैनाने 75 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. युसूफ पठाणने 50 चेंडूत 6 चौकार, तीन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी हरभजन सिंगचे पाच झेल सोडल्याने भारताच्या विजयाची वाट आसान झाली. पठाणला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले.

